लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘रन फॉर डेमोक्रसी’!

By admin | Published: January 24, 2017 02:35 AM2017-01-24T02:35:35+5:302017-01-24T02:35:35+5:30

वाशिम येथे ‘मिनी मॅराथॉन’चे आयोजन; ३७ हजार रुपयांची रोख बक्षिसे.

Run for Democracy 'for strengthening democracy! | लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘रन फॉर डेमोक्रसी’!

लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘रन फॉर डेमोक्रसी’!

Next

वाशिम, दि. २३- राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून देशभरातील मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. त्यानुसार, २५ जानेवारीला देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाशिममध्ये ह्यरन फॉर डेमोक्रसीह्ण, हे ब्रीद घेऊन ह्यमिनी मॅराथॉनह्ण स्पर्धा होत आहे.
वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील १५ जिल्ह्यांमधील तथा सर्व वयोगटातील नागरिकांना या अभिनव उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने गत १५ दिवसांपासून सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. त्यात जिल्हाभरातील १८ सेवाभावी संस्थांनी योगदान दिले आहे. पुरुषांसाठी १२ आणि महिलांसाठी ८ किलोमीटर अंतराची ही ह्यमिनी मॅराथॉनह्ण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना ३७ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात प्रथम बक्षीस ११ हजार रुपये, द्वितीय ९ हजार रुपये, तृतीय ७ हजार रुपये, चतुर्थ ५ हजार रुपये, पाचवे ३ हजार रुपये; तर सहाव्या क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय सहभागी होणार्‍या स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

किमान ५000 नागरिक होणार सहभागी!
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त काढण्यात येणार्‍या ह्यमिनी मॅराथॉनह्णमध्ये किमान ५ हजार नागरिक सहभागी होतील. या माध्यमातून भावी मतदार म्हणून युवक-युवतींना मतदानाचे महत्त्व समजावून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

Web Title: Run for Democracy 'for strengthening democracy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.