आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

By admin | Published: June 29, 2015 01:22 AM2015-06-29T01:22:11+5:302015-06-29T01:22:11+5:30

महाशिबिराला अल्प प्रतिसाद; ३0 जूनपर्यंत ८५ टक्क्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार.

Runway of the District Administration for the support connection | आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

आधार जोडणीसाठी वाशिम जिल्हा प्रशासनाची धावपळ

Next

वाशिम : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार जिल्हय़ातील मतदारांची आधार कार्डशी जोडणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सध्या चांगलीच धावपळ होत आहे. दरम्यान, २८ जून रोजी त्यानुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिरालाही जिल्हय़ात मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्याने ३0 जून अखेर ८५ टक्के मतदारांची आधारशी जोडणी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याची कसरत जिल्हा निवडणूक विभागाला करावी लागणार आहे. मतदार याद्या प्रामाणीकरण व शुद्धीकरण मोहीम जिल्हय़ात मार्च महिन्यापासून राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ात ११.११ टक्केच मतदारांची आधार कार्डशी जोडणी झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांशी तुलना करता वाशिम जिल्हा हा राज्यात पिछाडीवर पडला आहे. त्यानुषंगाने ३१ जुलै अखेर १00 टक्के आधारकार्डशी मतदार याद्यांचे लिंकअप होणे क्रमप्राप्त आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाला सध्या चांगलीच धावपळ करावी लागत आहे. ही मोहीम प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपजिल्हाधिकारी बी. के. इंगळे (निवडणूक) तथा सहाही तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सध्या जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. २८ जूनच्या महाशिबिराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हय़ातील अनेक मतदान केंद्रावर या अधिकार्‍यांनी भेटी देऊन प्रत्यक्षात मतदारांचा या मोहिमेस कितपत प्रतिसाद मिळतो, याची पाहणी केली. एप्रिल, मे आणि जून या तीनही महिन्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हास्तरावर महाशिबिर आयोजित केले आहेत. १२ एप्रिल, १८ मे आणि आता २८ जून अशी तीन महाशिबिरे या निमित्ताने झाली आहेत. मात्र, अद्यापही मतदारांचे आधार कार्डशी जोडणीची टक्केवारी ही १५ टक्क्यांपुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. अन्य जिल्हय़ात हे प्रमाण वाढत असून, वाशिम जिल्हा यामध्ये पिछाडीवर पडला आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात २२ जूनपर्यंत नऊ लाख १८ हजार ३८४ मतदारांपैकी अवघे ११.११ टक्के मतदारांचे आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुले वाशिम जिल्हा आधारलिंक संदर्भात राज्यात पिछाडीवर पडला आहे. आता अवघ्या एका महिन्यात जिल्हा प्रशासनाला आधार लिंगसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. आधार लिंक केल्यास मतदार यादीतील एका ठिकाणचे नाव वगळल्या जाते. असे असताना ग्रामीण भागातील अनेक मतदारांचे शहरी भागातील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याने अनेकजण आधार लिंकला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Runway of the District Administration for the support connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.