ग्रामीण भागात ‘राजकारण’ तापले

By admin | Published: July 18, 2015 02:17 AM2015-07-18T02:17:01+5:302015-07-18T02:17:01+5:30

निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न.

In the rural areas the 'politics' is heated | ग्रामीण भागात ‘राजकारण’ तापले

ग्रामीण भागात ‘राजकारण’ तापले

Next

वाशिम : नामांकन अर्ज भरण्याला अवघा एक दिवस शिल्लक असताना आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात राजकारण शिजत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जूनला जाहीर केला असून, त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जून मध्यरात्नीपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील ४९३ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत आहे. १३ जुलैपासून नामांकन अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायत, मालेगाव तालुक्यात ३0, मंगरूळपीर तालुक्यात २५, रिसोड तालुक्यात ३४, कारंजा तालुक्यात २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला आता केवळ सोमवार (दि.२0) हा एक दिवस शिल्लक असल्याने खर्‍या अर्थाने मोर्चेबांधणीने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात इलेक्शन फिवर चढला आहे. ग्रामपंचायत निवडणुक राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविली जात नसली तरी किती ग्रामपंचायतवर आपली सत्ता आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षांकडून होत आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक अतितटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. खासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, अमित झनक व लखन मलिक, माजी आमदार प्रकाश डहाके, अँड. विजयराव जाधव ऐनवेळी काय पत्ते फेकतात, यावर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.

Web Title: In the rural areas the 'politics' is heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.