ग्रामीण जनतेचा नवख्या चेहर्‍यांना कौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:09 AM2017-10-10T02:09:23+5:302017-10-10T02:09:56+5:30

वाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. 

The rural faces of the new faces! | ग्रामीण जनतेचा नवख्या चेहर्‍यांना कौल!

ग्रामीण जनतेचा नवख्या चेहर्‍यांना कौल!

Next
ठळक मुद्दे२७३ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीरगुलालांची उधळण करत विजयी उमेदवारांचा सर्मथकांसह जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणार्‍या जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यात विजयी होणार्‍या उमेदवारांनी आपल्या सर्मथकांसह जल्लोष साजरा केला. दरम्यान, सार्वत्रिक निकालावरून ग्रामीण जनतेने त्याच त्या चेहर्‍यांना डावलत बहुतांशी नवख्या चेहर्‍यांना कौल देत परिवर्तन घडविल्याचे पाहावयास मिळाले. यंदा प्रथमच सरपंचपाची निवड थेट जनतेतून झाल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. 
२७३ पैकी निवडणुकीपूर्वीच १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ७  ऑक्टोबर रोजी जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमधील २६१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. मतदानानंतर गावागावात राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पॅनल लढविणारे नेते व गावातील काही नागरिक कोण विजयी होणार व कोण पराभूत होणार, याचा अंदाज बांधत होते. 
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील कोरोनेशन हॉल, रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील इनडोअर स्टेडिअम, मालेगावातील तहसील कार्यालय, मंगरूळपीर येथील लालबहादूर शास्त्री भवन, कारंजा येथील शेतकरी निवास सभागृह आणि मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी विजयी होणार्‍या उमेदवारांनी व त्यांच्या सर्मथकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. १४ व्या वित्त आयोगांतर्गत शासनाकडून थेट ग्रामपंचायतींना मिळणारा विकास निधी आणि यंदा प्रथमच सरपंचाची निवड करण्याचे अधिकार जनतेच्या हातात आल्याने या निवडणुकीला आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. १२ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने वाशिम तालुक्यातील ४८, मालेगाव तालुक्यातील ४७, रिसोड तालुक्यातील ४७, कारंजा तालुक्यातील ५0, मंगरूळपीर तालुक्यातील ३३ आणि मानोरा तालुक्यातील ४0 ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. तथापि, राजकीय पक्ष आणि पक्षांच्या चिन्हाविना ७ ऑक्टोबरला पार पडलेल्या या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. यामुळे यंदा मतांचा टक्काही (७८.४३) वाढला. दरम्यान, क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणार्‍या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, आणि कोण पराभूत होणार, याकडे जनतेचे लक्ष लागून होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी आपले वर्चस्व पणाला लावून आपल्या मर्जीतील सर्मथकांना या निवडणुकीत उतरवून ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यात काही नेत्यांच्या गटांना यश मिळाले; तर काहींना अपयशाचे तोंड पाहावे लागले.

सरपंच वेगळ्या गटाचा; तर सदस्य वेगळ्या गटाचे!
ग्रामपंचायतीची निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नसून, स्वतंत्र गट तयार करून ती लढविली जाते. त्यानुसार, स्वतंत्र पॅनेल तयार करून उमेदवारांनी निवडणूक लढली; मात्र यंदा प्रथमच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून झाल्याने सरपंच एका गटाचा, तर निवडून आलेले सदस्य दुसर्‍याच गटाचे, अशी गोची झाल्याने भविष्यात ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा गाडा हाकताना मतभेद उफाळून येण्याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत.

Web Title: The rural faces of the new faces!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.