ग्रामीण रुग्णालयाची ‘ओपीडी’ राहणार बंद!
By admin | Published: October 9, 2016 01:46 AM2016-10-09T01:46:25+5:302016-10-09T01:46:25+5:30
मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमधील रुग्णांची गैरसोय होणार.
मालेगाव(जि. वाशिम),दि. 0८- ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांनी शुक्रवार, १४ ऑक्टोबर रोजी बाह्य रुग्ण तपासणी विभाग (ओपीडी) बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील रुग्णांची गैरसोय होणार आहे.
यापुर्वी देखील रुग्णालयातील कर्मचार्यांनी असुविधांमुळे ह्यओपीडीह्ण बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. मात्र, काही कालावधीनंतर या वादावर तोडगा निघाला होता. आता पुन्हा तोच विषय पुढे आला असून कर्मचार्यांचे वेतन प्रलंबित असल्याने ह्यओपीडीह्ण बंदचा मुद्दा तापला आहे. लवकरच हिंदू बांधवांचा दिवाळी; तर मुस्लिम बांधवांचा मोहरम हा महत्वाचा सण साजरा होणार आहे. अशाप्रसंगी वेतन नसल्याने संबंधित कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे कार्यालयामध्ये कार्यालयीन कारभार सांभाळणारा एकही कर्मचारी नसून आस्थापनावरील कर्मचार्यांचे वेतन ३ महिण्यांपासून प्रलंबित आहे. अत्यावश्यक औषधी खरेदी करण्यासाठी देखील निधी नसल्यामुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम होत आहे. उद्भवलेल्या गंभीर समस्यांबाबत वरिष्ठांना अनेकवेळ अवगत करूनही त्याचा कुठलाच फायदा होत नसल्याने अखेर कर्मचार्यांनी १४ ऑक्टोबरला ह्यओपीडीह्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.