ग्रामीण रस्त्यांना निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:41+5:302021-05-31T04:29:41+5:30
रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड हा चार किमी अंतराचा रस्ता मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असून, गत ...
रिसोड तालुक्यातील चिखली-व्याड हा चार किमी अंतराचा रस्ता मराठवाड्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असून, गत चार वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पंचायत समिती गणाचे गाव असलेल्या व्याड येथे चिखली मार्गे जाण्यासाठी खड्डामय रस्ता असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने समोरच्या वाहनाला बाजू देताना चालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली; परंतु अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत. वाशिम ते सुरकंडी यासह वाशिम ते अडोळी या रस्त्याचीदेखील दैना झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली.