कारंजा तालुक्यातील ६७ गावांत कारंजा तालुक्यातील ६७ गावांत होणार पाणंद रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:44 PM2020-02-23T16:44:55+5:302020-02-23T16:45:21+5:30

या कामी भारतीय जैन संघटनेचेही सहकार्य लाभणार आहे.

Rural roads to be constructed in 67 villages in Karanja taluka | कारंजा तालुक्यातील ६७ गावांत कारंजा तालुक्यातील ६७ गावांत होणार पाणंद रस्ते

कारंजा तालुक्यातील ६७ गावांत कारंजा तालुक्यातील ६७ गावांत होणार पाणंद रस्ते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत कारंजा तालुक्यातील ६७ रस्त्यांसाठी २५ लाखांचा निधी मिळाला असून, २३ फेब्रुवारी रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. या कामी भारतीय जैन संघटनेचेही सहकार्य लाभणार आहे.
कारंजा तालुक्यातील येवता, खेर्डा कारंजा व धामणी येथे २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी, भाजपाचे कारंजा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे, तहसिलदार धीरज मांजरे, जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनेश मालानी, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक प्रफुल्ल बानगावकर यांच्यासह ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शेतीवहीवाटीच्या रस्त्याची दुरूस्ती करून शेतकºयांचा पावसाळ्यात शेतमाल घरी आणण्याचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेउुन यासाठी मोफत जेसीबी मशिन उपलब्ध करून दिली तर डिझेल  व चालकाचा खर्च महसुल विभागाच्यावतीने करण्यात येईल. पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील शहादतपूर, कामठा, बेलख्ोड, पिंपळगाव बु., पलाना, ब्राम्हणवाडा, शिवन बु., लोणीअरब, पिंप्रीमोडक, खेर्डा कारंजा, लोहारा, लाडेगाव, मेहा, यावार्डी, येवताबंदी, नारेगाव, वाई, पोहा, बांबर्डा, वालई, यासह ६७ गावांतील पाणंद रस्त्यांची कामे केल्या जाणार आहे. शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती केल्याने व नवीन पाणंद रस्ते निर्माण होणार असल्याने गा्रमीण भागातील शेतकऽयांना पावसाळ्यात आपला शेतमाल घरी आणण्यासाठी मदत होईल, असा आशावाद यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Web Title: Rural roads to be constructed in 67 villages in Karanja taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.