पाचवी ते आठवीच्या शाळांची घाई, पण सफाईच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:48+5:302021-01-22T04:36:48+5:30
जिल्ह्यात जि.प., न.प. आणि खासगी संस्थांच्या मिळून पाचवी ते आठवीपर्यंतच्या ७१४ शाळा आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या शाळांचे वर्ग ...
जिल्ह्यात जि.प., न.प. आणि खासगी संस्थांच्या मिळून पाचवी ते आठवीपर्यंतच्या ७१४ शाळा आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या शाळांचे वर्ग अद्यापही भरविण्यात आले नसून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विविध शासकीय कार्यक्रम वगळता इतर काळात शाळांच्या खोल्या आणि कार्यालये बंदच राहिली. आता कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीच्या शाळा कोरोना संसर्गाची दक्षता घेऊनच सुरू करण्याचे निर्देश दिले. अवघ्या सहा दिवसांवर शाळा सुरू होण्याची वेळ आली असतानाही शाळांची साफसफाई मात्र करण्यात आली नसल्याचे चित्र अनेक खासगी आणि जि.प.च्या शाळांची पाहणी केल्यानंतर दिसून आले.
---------------------
विलगीकरणाच्या काळानंतर दुर्लक्ष
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांतील वर्गखोल्या गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याने आत धूळ साचली आहे. लॉकडाऊनदरम्यान परजिल्ह्यातून, पराज्यातून परतलेल्या नागरिकांना कोरोना संसर्गाची दखल घेऊन विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यासाठी शाळांच्या वर्गखोल्यांचा वापर करण्यात आला. तो काळ संपल्यानंतर शाळा रिकाम्या झाल्या आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले; परंतु त्यानंतर आजवर या शाळांची सफाईच करण्यात आली नाही.
---------------------
मतदान प्रक्रियेतील कचराही जैसे थे
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शाळा इमारतीचा मतदान कक्ष म्हणून वापर करण्यात आला. त्यात काही पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळांचाही समावेश होता. ही प्रक्रिया होण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले; परंतु प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांचे निर्जंतुकीकरण आणि साफसफाईसुद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या कागदांसह इतर साहित्याचा कचरा अद्यापही शाळांच्या वर्गखोल्यांत पडून असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले.
-----
पाचवी ते आठवीच्या शाळा
शाळेचा संवर्ग शाळा
जि.प., न.प. ३०१
खासगी प्राथ. ९५
शासकीय माध्य. ९
खासगी माध्य. ३०१
एकूण ७१६
===Photopath===
210121\21wsm_2_21012021_35.jpg
===Caption===
शाळांची घाई, पण सफाईच नाही !