निर्दयी मातेने एक महिन्याच्या चिमुकलीस मंदिरात सोडले बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:48 PM2020-10-10T12:48:36+5:302020-10-10T12:49:00+5:30

Washim News पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या चिमुकलीस तिच्या पित्याच्या स्वाधीन केले.

The ruthless mother left her Girl in the temple for | निर्दयी मातेने एक महिन्याच्या चिमुकलीस मंदिरात सोडले बेवारस

निर्दयी मातेने एक महिन्याच्या चिमुकलीस मंदिरात सोडले बेवारस

Next

उंबर्डा बाजार : महिनाभराच्या चिमुकलीस जन्मदात्रीनेच मंदिरात बेवारस सोडून क्रूरतेचा कळस गाठल्याची घटना कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार ते जांब मार्गावर ९ आॅक्टोबर रोजी घडली. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या चिमुकलीस तिच्या पित्याच्या स्वाधीन केले.
कारंजा तालुक्यातील दुघोरा येथील किशोर भगत या इसमाची पत्नी महिनाभराच्या चिमुकलीस घेऊन सासºयासह उंबर्डा बाजार येथील खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी सकाळी गेली होती. तपासणीनंतर तिचे सासरे आॅटोरिक्षा पाहण्यासाठी बसस्थानकावर गेले; परंतु परतल्यानंतर त्यांना सून आणि त्यांची महिनाभराची नात तेथे दिसली नाही. परिसरात चौकशी केल्यानंतर सून आणि नात न दिसल्याने ते रडवेल्या चेहºयाने घरी परतले. दरम्यान, उंबर्डा बाजार ते जांब मार्गावर एका गावाबाहेरच्या मंदिरात बाळाच्या रडण्याचा आवाज रस्त्याने जाणाºया ग्रामस्थांना ऐकू आला. त्यांनी शोध घेतला असता हनुमानाच्या मंदिरातील गाभाºयात एक चिमुकली रडत असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यावरून कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार वानखडे यांनी तपास चक्रे फिरवित तिच्या कुटुंबाचा शोध लावत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून तिला कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. यात उंबर्डा बाजार पोलीस चौकीचे जमादार कैलास गवई, गजानन इंगोले, पो.कॉ.नितीन पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. वृत्त लिहित असेपर्यंत महिनाभराच्या चिमुकलीस मंदिरात बेवार सोडणाºया निर्दयी मातेचा शोध लागला नव्हता.

 

 

Web Title: The ruthless mother left her Girl in the temple for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम