सावित्रीच्या मुलींची शिक्षणासाठी पायदळ वारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:43 PM2017-07-29T13:43:42+5:302017-07-29T13:43:42+5:30

saavaitaraicayaa-maulaincai-saikasanaasaathai-paayadala-vaarai | सावित्रीच्या मुलींची शिक्षणासाठी पायदळ वारी 

सावित्रीच्या मुलींची शिक्षणासाठी पायदळ वारी 

Next

जऊळका रेल्वे : शिक्षित होऊन समाज विकासात हातभार लावण्याचा प्रयत्न करणाºया मुलींना शिक्षण घेण्यासाठी ७ किलोमीटर पायदळ वारी करावी लागत आहे. मानव विकास मिशनची बस बंद असल्याने मालेगाव तालुक्यातील वरदरी येथील मुलींवर हा प्रसंग ओढवल्याचे वास्तव आहे; परंतु परिवहन महामंडळाचे अधिकारी तकलादू कारणेसमोर करून या गावातील बस सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

मालेगाव तालुक्यातील वरदरी  खुर्द  हे आदिवासी बहुल गाव जऊळक्यापासून ७ कि़लोमीटर अंतरावर आहे. या गावातून वर्ग ६ वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाºया मुली जऊळका रेल्वे येथे शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षण घेता यावे, त्यासाठी संबंधित शाळेच्या गावांत पोहोचण्यास सुविधा असावी म्हणून मानव विकास मिशनच्यावतीने या विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळामार्फत मोफत बससेवा सुरू करण्यात आली. या बसेसचा खर्च मानव विकास मिशनच्यावतीनेच उचलण्यात येतो, तर सुटीच्या काळात आणि शालेय सत्र सुरू असतानाही या बसमधील उर्वरित आसनांवर प्रवासी वाहतूक करण्यास परिवहन महामंडळाला मूभा आहे. यामुळेच जऊळका ते वरदरी अशी मानव विकास मिशनची बस विद्यार्थिनींसाठी सुरू करण्यात आली होती. ती सुरुवातीला व्यवस्थितपणे चालतही होती; परंतु यंदाच्या सत्राला दोन महिने झाले तरी, ही बस अद्यापही सुरू करण्यात आली नाही.  त्यामुळे या बसमधून प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनी वरदरी ते जऊळकापर्यंत जीव मुठीत घेऊन पायदळ वारी करीत शिक्षण घेत आहेत.  सदर बस का सुरू करण्यात आली नाही, अशी विचारणा  संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली असता गावाचा रस्ता खराब आहे, त्यावर खडयांची  संख्या जास्त आहे. असेही बसच्या चालकाची तक्रार आहे, असे कळले, परंतु पालकांच्या म्हणण्यानुसार सदरील बसचालक अंतर्गत वादावरुन हे कृत्य करीत आहे. सरपंच, ग्रा.पं.सदस्य, मुलीचे पालक यांनी लेखी निवेदन देवुन बस चालु करण्याची मागणी केली. शासन मुलीच्या शिक्षणासाठी लाखो खर्च करुन त्यांना ने आण साठी लाखो रुपये खर्च करीत आहे येथे चालू बस बंद करत आहेत.

मालेगाव तालुक्यासाठी मानव मिशनच्या शंभर किलोमीटर मर्यादेच्या सात बसगाड्या उपलब्ध होत्या. त्या सुरू आहेत. याशिवाय नव्या बसगाड्यांची आवश्यकता असेल, तर संबंधित शाळांनी आमच्याकडे रितसर अर्ज करून मागणी करावी. आम्ही त्यांची मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मानव विकास मिशनकडे मांडून बसगाड्या वाढविण्याचा प्रयत्न करू. शाळा व पालकांनी आमच्याकडे विद्यार्थीनींसाठी मानव मिशनच्या बसफेºयांची मागणी करावी. 

- एस. बी. क्षीरसागर

विभागीय वाहतूक अधिकारी 

परिवहन महामंडळ अकोला विभाग

Web Title: saavaitaraicayaa-maulaincai-saikasanaasaathai-paayadala-vaarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.