वाशिम : शिरपुरात देशभरातील साधू-साध्वींची मांदियाळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:09 AM2018-02-05T01:09:41+5:302018-02-05T01:12:53+5:30
शिरपूर जैन: येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानमध्ये डॉ. इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांच्या जीवित महोत्सवानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक अनुष्ठान व सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात देशभरातील जैन मुनींसह ६४ साधू-साध्वींनी सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानमध्ये डॉ. इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांच्या जीवित महोत्सवानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक अनुष्ठान व सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात देशभरातील जैन मुनींसह ६४ साधू-साध्वींनी सहभाग नोंदविला.
आचार्य जगच्चंद्रसुरिश्वरजी महाराज, अंतरिक्ष तीर्थ विकास प्रेरक पंन्यास प्रवर विमलंहस विजयजी महाराज, पंन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्यासह इतर ६४ जैन मुनी व ५00 जैन श्वेतांबर भक्तांच्या उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. गत २५ वर्षात पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा संख्येने शिरपूर जैनमध्ये जैन मुनींचे आगमन झाले होते.
या महोत्सवात अकोला येथील विधीकार हर्षदभाई शाह यांच्या सानिध्यात सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजन करण्यात आले. मुंबई येथील प्रसिद्ध जैन संगीतकार प्रतीक गेमावत यांनी मातृपितृ सिद्धचक्र वंदना हा संध्याभक्ती कार्यक्रम प्रस्तुत केला. सागर केंदुलकर यांनी १८ पापस्थानक नवृत्ती हेतू आलोचनाचे पूजन केले. या महोत्सवानिमित्त इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांची लाडूतुला करण्यात आली. छल्लानी परिवारातर्फे यानिमित्त पारसबाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे दिनेश मुथा, बाबुराव बोराटे, अशोक भन्साली, जयदीप कोठारी, राहुल जैन, राजेशभाई शाह, मनीष बारमेचा आदींनी पुढाकार घेतला.
जगच्चंद्रसुरिश्वरजी महाराजांचे आज वाशिममध्ये आगमन
जैन समाजातील जैन मुनी आचार्य जगच्चंद्रसुरिश्वरजी महाराज यांच्यासह ६४ जैनमुनींचे ५ फेब्रुवारीला वाशिम शहरात आगमन होत आहे. येथे आयोजित प्रवचनाच्या कार्यक्रमानंतर त्यांचे हिंगोलीकडे प्रस्थान होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.