मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:59+5:302021-08-12T04:46:59+5:30

मंगरुळपीर येथील श्री सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात सहविचार सभा देवीभक्त कबीरदास महाराज यांच्या हस्ते श्री जगदंबा ...

Sahavichar Sabha held at Mangrulpeer | मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

मंगरुळपीर येथे सहविचार सभा संपन्न

Next

मंगरुळपीर येथील श्री सेवालाल महाराज मंदिर प्रांगणात सहविचार सभा देवीभक्त कबीरदास महाराज यांच्या हस्ते श्री जगदंबा देवी, श्री संत सेवालाल महाराज, श्री संत डॉ रामरावजी बापू यांचे पूजन करून सहविचार सभा सुरू झाली. श्री संत सेवालाल महाराज मंदिर प्रशासनतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. या सभेला मंगरुळपीर बंजारा नायक ज्ञानेश्वर राठोड , शिवचंद चव्हाण कारभारी, कैलास राठोड, श्री सेवालाल महाराज मंदिर अध्यक्ष, धीरज देविदास चव्हाण, देवीसिंग राठोड, आय. टी. राठोड, राजाराम राठोड, रामराव राठोड, जी. के. राठोड, मंगेश आडे, भारत जाधव, हिरासिंग राठोड, हरीश व्ही. चव्हाण,कैलास नथुसिंग राठोड, दशरथ बदुसिंग राठोड कारभारी, नागेश राठोड, प्रदीप राजूसिंग चव्हाण, गुलाब जाधव, डी. एच. पवार, एस. के. राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कारंजा येथील तोताराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

देवीभक्त कबीरदास महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभेला सुरुवात झाली. सहविचार सभेचे संचालन धीरज चव्हाण यांनी केली. कैलास राठोड यांनी प्रास्ताविक करून संकल्प दौऱ्यातील सर्व मान्यवर मंडळींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सहविचार सभेचे व संकल्प दौऱ्याचा हेतू व प्रयोजनाबाबत विलास राठोड यांनी सविस्तर मार्गदर्शन करून श्री संत डॉ.धर्मगुरू रामरावजी बापूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजबांधवांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्रा. प्रकाश राठोड यांनी या सहविचार सभेत श्री सेवालाल महाराज साधक परिवार निर्माण करून या मंदिर विकासासाठी व श्री सेवालाल महाराजांचे विचार व शिकवण याचा प्रसार व प्रचार करण्यात किती वाटा व गरज याविषयी माहिती दिली.

श्री देवीभक्त कबीरदास महाराज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंदिर प्रशासन व त्याचा आर्थिक कारभारात पारदर्शकता आणि लोकाभिमुख कसे राहील आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

डी. एच. पवार यांनी आभार प्रदर्शन करून सहविचार सभेची सांगता केली.

Web Title: Sahavichar Sabha held at Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.