साई मंदिर समितीने घेतला रुग्णसेवेचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:55 PM2018-05-11T13:55:22+5:302018-05-11T13:55:22+5:30

वाशिम: शहरातील ड्रीमलॅण्ड सिटी परिसरातील साई मंदीर समितीने गोरगरीब, गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.

Sai Temple Committee took care of the patient's | साई मंदिर समितीने घेतला रुग्णसेवेचा वसा

साई मंदिर समितीने घेतला रुग्णसेवेचा वसा

Next
ठळक मुद्देउपक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेचे सदस्य कुसूम गोरे यांचे हस्ते ११ मे रोजी करण्यात आले.  साई समितीच्या सामाजीक उपक्रमामुळे साई मंदिराची पंचक्रोशीमध्ये अतिशय चांगली प्रसिध्दी झाली आहे. 

वाशिम: शहरातील ड्रीमलॅण्ड सिटी परिसरातील साई मंदीर समितीने गोरगरीब, गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत दर गुरूवारी मोफत रूग्णसेवा देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेचे सदस्य कुसूम गोरे यांचे हस्ते ११ मे रोजी करण्यात आले. 
यावेळी व्यासपिठावर डॉ. दीनेश राठी, नगर परिषदेचे सदस्य गौतम सोनोने, सागर गोरे, साई ध्यान मंदिर समितीचे अध्यक्ष धनंजय कपाले, अनिल तोलाणी, बंडूभाऊ सरप, राजूभाऊ नागदेव, बंडूभाऊ गांजरे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समायोचीत भाषणे पार पडली. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की, साई मंदिर समितीच्या सदस्यांनी गेल्या वर्षभरामध्ये मंदिर व मंदिर परिसराची वाखाणण्याजोगी प्रगती केली. दर गुरूवारला या ठिकाणी हजारो भाविकांना नित्यनेमाने बेसन पोळीचा महाप्रसाद दिला जातो. याशिवाय सामाजीक उपक्रमामध्येही साई मंदिर समितीने उल्लेखनीय कार्य केले. साई समितीच्या सामाजीक उपक्रमामुळे साई मंदिराची पंचक्रोशीमध्ये अतिशय चांगली प्रसिध्दी झाली आहे. 
यावेळी कार्यक्रमाला रूपेश, बिटोडकर महाराज, दीपक चव्हाण, अमोल गांजरे, केशवराव भुतकर, चंद्रकांत देशमुख, गोपाल कणसे, पवन मुंदडा, काकडे महाराज, देवढे पाटील यांच्यासह शेकडो साईभक्तांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार नितेश भिंगे यांनी मानले. 

Web Title: Sai Temple Committee took care of the patient's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.