बंगळुरूत पार्लर चालविणारा ‘ज्ञानेश’ मसलापेन गावात उभारतोय ३ कोटी रुपयांचे साई मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:43 PM2018-04-09T14:43:06+5:302018-04-09T14:43:06+5:30
शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत.
शिरपूर जैन : रिसोड तालुक्यातील छोटेसे गाव मसलापेन. येथील मुळचा रहिवासी असलेले परंतु सद्यस्थितीत बंगळुरू येथे व्यवसायासाठी गेलेले ज्ञानेश राठोड स्वखर्चातून आपल्या मुळगावी ३ कोटी रुपये खर्चाचे साईमंदिर उभारताहेत. मंदिर उभारणीनंतर येथे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
ज्ञानेश ठाकुर हे मुळचे मसलापेन येथील रहिवासी असून गत १६ ते १७ वर्षाआधी ते बंगळुरू येथे गेलेत. तेथे त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला. अतिशय मनमिळावू व होतकरु वृत्तीमुळे त्यांच्या व्यवसायाला चांगलीच भरभराटी लाभली. त्यांच्या पार्लरमध्ये कर्नाटकामधील चित्रपटातील अभिनेते, क्रीकेटर येण्यास सुरुवात झाली. मसलापेन येथे वास्तव्यास असताना अतिशय गरिब परिस्थितीमध्ये जीवन कंठत असताना गावाची लाभलेली साथ व गावकºयांच्या प्रेमापोटी आपणही गावात काहीतरी करावे असे मनी इच्छा असतांना त्यांनी गावात साई मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी १० लाख रुपये किंमतीची १०० बाय १०० जागा रिसोड रस्त्यावरील मसलापेन येथे विकत घेतली. व त्यावर साईमंदिराचे बांधकाम करण्यास सुरुवात केली.दोन वर्षांपासून या मंदिराचे काम सुरु असून आतापर्यंत जवळपास २.६५ कोटी रुपये बांधकामावर खर्च करण्यात आले आहे. येत्या विजयादशमीला साई पुण्यतिथी शताब्दी सोहळयाला या मंदिराचे लोकार्पण करण्याचा ज्ञानेश यांचा मानस आहे. मंदिर लोकार्पणानंतर येथे दररोज भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबविण्याचा मानस ज्ञानेश ठाकुर यांनी व्यक्त केला.