संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शेगावला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:32 PM2019-12-18T14:32:31+5:302019-12-18T14:33:02+5:30
संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली.
शिरपूर जैन: मराठवाड्यातील शेगाव खोडके येथून गजानन महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांच्या सानीध्यात निघालेली संत गजानन महाराज यांची पायदळ दिंडी शिरपूर येथील मुक्कामात आटोपून 18 डिसेंबर रोजी शेगाव कडे रवाना झाली.
दरवर्षी शेगाव खोडके ते श्रीक्षेत्र शेगाव अशी वारकऱ्यांची पायदळ दिंडी काढण्यात येते. 16 डिसेंबर रोजी शेगाव खोडके येथून निघालेली वारकऱ्यांची दिंडी रिसोड मार्गे किनखेड येथील मुक्काम आटोपून 17 डिसेंबर रोजी सायंकाळी शिरपूर तेथे मुक्कामासाठी आली. स्थानिक जानगीर महाराज संस्थान मध्ये दिंडीचा मुक्काम होता. दिंडीतील वारकऱ्यांसाठी गजानन भक्त विजय सोपान जाधव यांच्याकडून भोजनाची मेजवानी देण्यात आली. 18 डिसेंबर रोजी सकाळी दिंडी मार्गस्थ झाली असता सुधाकर वाघ यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तर विजय जाधव यांच्याकडून सुद्धा चहापान करण्यात आले. त्यानंतर दिंडी श्री गजानन महाराजांचा जयघोष करीत मालेगाव मार्गे श्री शेत्र शेगाव च्या दिशेने रवाना झाली.