युवकाने रेखाटलेली रांगोळी ठरली संत नरहरी महाराज पुण्यतिथीचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:11 PM2018-02-03T14:11:08+5:302018-02-03T14:12:16+5:30
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शनिवारी संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन विश्वकर्मा मूळ देवस्थानात करण्यात आले होते. या सोहळ्यात राजेश खंदारकर या युवकाने रांगोळीतून रेखाटलेली संत नरहरी महाराजांची प्रतिमा सर्वांसाठी आकर्षण ठरली.
श्री. विश्वकर्मा मुळ देवस्थान शिरपूर येथे संत नरहरी महाराज यांची ७३२ व्या पुण्यतिथी शनिवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन संस्थानचे विश्वस्थ अतुल खंदारकर तथा विनोद मुगवानकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांच्या जीवन चरित्रावर शाम दीक्षित तथा गणेश गिरडे यांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्र मासाठी समाजातील कलावंत राजेश खंदारकर यांनी रांगोळीतून नरहरी महाराजांची अतिशय आकर्षक अशी प्रतिमा रेखाटली. ही रांगोळी सर्वांसाठी आकर्षण ठरली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुजारी विष्णुपंत नवले, बाळासाहेब धुडकेकर, संतोष महाळंकर, अरुण महाळंकर, योगेश महाळंकर , किशोर मुगवानकर, शाम खोलगाडे, सोनू महामुने यांनी परीश्रम घेतला. आरती व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.