तलावामधाेमध साकारतेय जगदंबा मातेचे संगमवराचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:21+5:302021-03-29T04:23:21+5:30

मागील काही वर्षामध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले हाेते, परंतु सदर मंदिराला काही ठिकाणी तडे गेले हाेते. एस.जी.जाधव यांच्या माध्यमातून ...

Sakamteya Jagdamba Mother's Sangamvara temple in the middle of the lake | तलावामधाेमध साकारतेय जगदंबा मातेचे संगमवराचे मंदिर

तलावामधाेमध साकारतेय जगदंबा मातेचे संगमवराचे मंदिर

Next

मागील काही वर्षामध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले हाेते, परंतु सदर मंदिराला काही ठिकाणी तडे गेले हाेते. एस.जी.जाधव यांच्या माध्यमातून आता राजस्थान येथील शिल्पकारांच्या साहाय्याने आकर्षक संगमवरी दगडाचे मंदिर बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

भर जहागिर येथील आसरा माता देवस्थान हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथील मंदिर बांधकामासाठी अनेक दाते पुढे येतात परंतु एस.जी.जाधव मागील अनेक वर्षांपासून स्वत: लाखोंचा खर्च करीत आहे. दर दिवसाला शेकडो भक्तांची येथे मांदियाळी राहते. रिसोड ते लोणार सरोवर या राज्यमार्गावर हे मंदिर आसल्याने बहुतांश रहदारी करणारी भक्त मंडळी येथील आकर्षण पाहुण थांबा घेतात. मागील एक वर्षांपासून एस.जी.जाधव स्वखर्चाने येथील संपूर्ण मंदिराचा कायापालट करीत आहे.संपूर्ण मंदिराला राजस्थान येथील आकर्षक संगमवर दगडाचे कलाकुसरीचे अविरत काम शिल्पकारांच्या हाताने सुरू आहे. पूर्वीच्या मंदिराचा चेहरामोहरा बदलून सुसज्ज व प्रलोभनीय मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून प्रशस्त सभामंडप, स्वयंपाकगृह, तलावाचे खोलीकरण, तलावामध्ये जाण्यासाठी सुसज्ज पायऱ्यांचे बांधकाम, तलावामध्ये रपेट मारण्यासाठी दोन पाण्यातील बोटींसह आदी कामाची व्यवस्था येथे केल्या जाणार आहे. या मंदिर बांधकामासाठी सुमारे एक कोटी पर्यंत खर्च येणार असल्याची माहिती कामावरील काही व्यक्तींनी दिली आहे.

Web Title: Sakamteya Jagdamba Mother's Sangamvara temple in the middle of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.