समाजकार्य महाविद्यालयाच्या कर्मचाºयांचे वेतन थकले

By admin | Published: March 30, 2017 08:25 PM2017-03-30T20:25:12+5:302017-03-30T20:25:12+5:30

शिक्षक   व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ४२ क र्मचाºयांचे वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.

The salary of employees of social work college tired | समाजकार्य महाविद्यालयाच्या कर्मचाºयांचे वेतन थकले

समाजकार्य महाविद्यालयाच्या कर्मचाºयांचे वेतन थकले

Next

वाशिममधील प्रकार: ४२ कुटुंबांवर उपासमारीची पाळी 
वाशिम: स्थानिक सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक   व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ४२ क र्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. यातील १२ कर्मचाऱ्यांचे वेतन डिसेंबर २०१६ पासून, तर उर्वरित ३० कर्मचाऱ्यांचे वेतन जानेवारी २०१७ पासून थकले आहे.
वाशिम येथे सरस्वती समाजकार्य महाविद्यालय एका संस्थेमार्फत चालविले जाते. या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी सामाजिक शास्त्रांतील विविध विषयाचे ज्ञानार्जन करीत असतात. या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रांच्या आधारे समाजकार्याचे धडे देण्यासाठी प्राध्यापक आणि इतर कार्यालयिन कामकाजासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून निधी प्राप्त होत असतो; परंतु मागील दोन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून निधीच प्राप्त झाला नसल्याने आणि यातील १२ कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके तांत्रिक अडचणीमुळे विलंबाने पाठविल्याने डिसेंबर २०१६ पासून, तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन जानेवारी २०१७ पासून थकले आहे. 

Web Title: The salary of employees of social work college tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.