ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पगारी सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:34 AM2021-01-15T04:34:02+5:302021-01-15T04:34:02+5:30

खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे,नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती ...

Salary leave for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पगारी सुटी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पगारी सुटी

Next

खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे,नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर यासारख्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानातील कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता पूर्ण दिवस पगारी सुटी देण्यात यावी. पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुटी ऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधितांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मतदानाकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत मतदारांकडून तक्रार आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने दिला.

Web Title: Salary leave for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.