वाकद गावात बनावट दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:41 AM2021-03-16T04:41:53+5:302021-03-16T04:41:53+5:30
वाकद गावात, तसेच परिसरात मोठ्या लोकसंख्येची अनेक गावे आहेत. गावातील नागरिक बसथांब्यावर, तसेच देशी दारू दुकानांच्या सभोवताल जमून गोंधळ ...
वाकद गावात, तसेच परिसरात मोठ्या लोकसंख्येची अनेक गावे आहेत. गावातील नागरिक बसथांब्यावर, तसेच देशी दारू दुकानांच्या सभोवताल जमून गोंधळ घालण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. परिणामी, शेतात जाणाऱ्या महिलांसह शाळकरी मुलींनाही त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना वाकद येथे परवानाधारक देशी दारू विक्रेता कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसत नाही. सकाळी दुकान उघडण्याची वेळ पाळली जात नाही. तसेच रात्रीही उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या दारू दुकानाची वरिष्ठ स्तरावरून तपासणी करून परवाना रद्द करावा व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी वाकद येथील महिलांमधून होत आहे.