वाशिम जिल्ह्यात अनुदानित खताची ‘ऑफलाईन’ पद्धतीने विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 03:16 PM2020-02-07T15:16:09+5:302020-02-07T15:16:16+5:30
नुदानित खतांची विक्री पॉस मशीननेच करण्याच्या सक्त सुचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विके्रते पॉस मशीनचा वापर टाळून या खतांची विक्री करीत असल्याने नेमका उपलब्ध साठा कळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आवश्यक प्रमाणात खतांची मागणी नोंदविण्यात कृषी विभागाला अडथळे येत आहेत. या पृष्ठभुमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सर्व कृषी निविष्ठा विके्रत्यांना पॉस मशीनचा वापर करण्याच्या कडक सुचना देतानाच. अनुदानित खतांची विक्री आॅफलाईनने होत आहे काय ते पडताळण्यासाठी सर्व कृषी निविष्ठा विके्रत्यांच्या पॉस मशीनची झाडाझडती घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कृषी निविष्ठा विके्रत्यांना अनुदानित खतांची विक्री पॉस मशीननेच करण्याच्या सक्त सुचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत. तथापि, वाशिम जिल्ह्यात या सुचनेचे उल्लंघन करून कृषी निविष्ठा विके्रते आॅफलाईन पद्धतीने अनुदानित रासायनिक खतांची विक्री करीत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असल्याचे आॅनलाईन रेकॉर्डवर दिसते. प्रत्यक्षात मात्र आवश्यकतेनुसार जिल्ह्यात युरिया किंवा रासायनिक खतांचा उपलब्ध नाही. तथापि, आॅनलाईन रेकॉर्डवर खतांचा साठा शिल्लक दिसत असल्याने या खतांची मागणी करण्यात अडथळा येत असून, शेतकºयांना ही खते मिळणे कठीण होणार आहे. या गंभीर प्रकाराची दखल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी घेत सर्व तालुका कृषी अधिकाºयांसह पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांना कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करून अनुदानित खतांची विक्री पॉस मशीननेच करण्याबाबत कृषी निविष्ठा विके्रत्यांना कठोरपणे सुचित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून कृषी विभागाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडील उपलब्ध साठा आणि पॉस मशीनची झाडाझडती घेण्याची मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाºयांवर होणार कारवाई
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आॅफलाईन पद्धतीने होत असलेली अनुदानित खतांची विक्री थांबविण्यासाठी कृषी निविष्ठा केंद्रांची झाडाझडती घेण्यात येत असतानाच नियमांचे उल्लंघन करणाºयांचे परवाने निलंबित करणे किंवा इतर प्रकारची कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवरही कारवाईचा प्रस्ताव तातडीने जिल्हा अधीक्षक कार्यालयास सादर करण्याच्या सुचनाही अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सर्व तालुकास्तरावरील अधिकाºयांना दिल्या असून, कोणत्याही प्रकारे या खतांची जादा दराने विक्री होणार नाही, याची दक्षताही घेण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात आॅनलाईन रेकॉर्डवर अनुदानित खतांचा साठा उपलब्ध असल्याचे दिसते. प्रत्यक्षात मात्र, साठा कमी आहे. काही कृषी निविष्ठा विके्रत्यांनी आॅफलाईन पद्धतीने खतांची विक्री केल्याने हा गोंधळ झाला आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करून त्यांना पॉस मशीनचा वापर अनिवार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
-एस. एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, वाशिम