विक्रीकर विभागाचे आज नामांतर

By admin | Published: July 1, 2017 01:04 AM2017-07-01T01:04:33+5:302017-07-01T01:04:33+5:30

विक्रीकर विभागाचे नाव बदलून वस्तू व सेवा कर कार्यालय करण्यात येणार असून, १ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ वाजता फलक अनावरण करण्यात येणार आहे.

Sales tax department's nomination today | विक्रीकर विभागाचे आज नामांतर

विक्रीकर विभागाचे आज नामांतर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशात १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर कायदा लागू होत आहे. त्यामुळे देशातील अप्रत्यक्ष कर प्रणालीत आमूलाग्र बदल होत आहे. या कायद्यामुळे विक्रीकर विभागाचे नाव बदलून वस्तू व सेवा कर कार्यालय करण्यात येणार असून, १ जुलै २०१७ रोजी सकाळी ११ वाजता फलक अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक विक्रीकर आयुक्त डॉ. प्रतीक राठोड यांनी दिली.
वस्तू व सेवा कर प्रणाली लागू करताना काही कायदेशीर तरतुदी, प्रक्रियांमध्ये अडचणी असल्यास त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील. तसेच व्यापाऱ्यांना नोंदणी, विवरणपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता वस्तू व सेवाकर विभागाच्या कार्यालयामध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. कापड उद्योगातील व्यापाऱ्यांप्रमाणे जे करदाते नव्यानेच कर भरण्यास पात्र होत आहेत, त्यांना ३० जुलै २०१७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ज्या करदात्यांना नवीन नोंदणीसाठी अर्ज करावयाचे आहेत, त्यांना वस्तू व सेवाकर विभागातील जीएसटी सुविधा केंद्र तसेच शासन मान्य ई-सेवा केंद्रांतून मदत घेऊनसुद्धा आॅनलाइन अर्ज करता येईल, असे डॉ. राठोड यांनी सांगितले.

Web Title: Sales tax department's nomination today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.