समनक जनता पार्टीचे शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन
By नंदकिशोर नारे | Published: October 30, 2023 05:20 PM2023-10-30T17:20:56+5:302023-10-30T17:21:25+5:30
मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील उभे पिके वन्यप्राणी फस्त करीत असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
वाशिम : मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक वन्य प्राणी फस्त करीत आहे. वाशीम जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करा या सह इतर मागण्याकरिता समनक जनता पार्टी कडून ३० आक्टोबरला मानोरा येथील शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करून मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
मानोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतातील उभे पिके वन्यप्राणी फस्त करीत असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. वाशीम जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावे. वन विभागाच्या हद्दीत पक्की भिंत निर्माण करण्यात यावी. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासकीय योजना राबविण्यात यावे. वन्य प्राणीपासून पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमात समावेश करून नुकसान भरपाई देण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री व वन मंत्री यांना निवेदन देण्यात आले . निवेदन दिल्यावर यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन दोन तास चालल्याने मंगरूळपीर व कारंजा वरून येणारी वाहतूक प्रभावित झाली . नंतर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अनिल राठोड, कारंजा विधानसभा प्रमुख प्रकाश राठोड, गजानन धामणे, गोपाल चव्हाण, सूचिल चव्हाण, विनायक मोटे, रमेश लांडगे, सुनील जाधव, सुनील राठोड, प्रतीक राठोड, लीलाधर नागोलकार, प्रकाश राठोड, शीतल चव्हाण, अनुसया इंगळे, राधिका डोईफोडे, संगीता काळबांडे, लक्ष्मी पांगसे, अनुराधा ठाकरे,यांचे सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.