समता फाऊंडेशन पुरविणार लसींचे ६० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:24+5:302021-05-22T04:37:24+5:30
रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, भारत माध्यमिक शाळा व उत्तमचंद बगडिया कला व विज्ञान महाविद्यालय या तीन ठिकाणी लसीकरण ...
रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल, भारत माध्यमिक शाळा व उत्तमचंद बगडिया कला व विज्ञान महाविद्यालय या तीन ठिकाणी लसीकरण प्रक्रिया पार पडणार आहे. रिसोड शहरातील सर्व नागरिकांना लस मिळावी, हा त्यामागील उद्देश असून शासनाकडून मंजुरी मिळताच हा उपक्रम येथे राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक पार पडली. त्यात याविषयी सविस्तर चर्चा झाली.
रिसोड तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनचेही या मोहिमेस सहकार्य मिळणार असून शासन दरबारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक जूनपासून लसीकरण मोहीम सुरू होण्याचे संकेत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दोन गावांमध्ये समता फाऊंडेशनने शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले असून त्याच धर्तीवर रिसोडमध्येही लसीकरण करण्याचा फाऊंडेशनचा मानस असल्याचे कळविण्यात आले आहे.
......................
कोट :
शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, या उद्देशाने नगर परिषद प्रशासन, समता फाऊंडेशन व डॉक्टर असोसिएशनच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविण्याचा मानस आहे. ही मोहीम रिसोड शहरात १ जूनपासून युद्धस्तरावर राबविण्यात येणार आहे.
- विजयमाला आसनकर
नगराध्यक्ष, रिसोड