समता परिषद राज्यात अवयव दानाची मोहीम राबविणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:03 PM2017-10-08T14:03:14+5:302017-10-08T14:03:30+5:30

Samata Parishad will organize an organ donation campaign in the state |  समता परिषद राज्यात अवयव दानाची मोहीम राबविणार 

 समता परिषद राज्यात अवयव दानाची मोहीम राबविणार 

Next

वाशिम : राज्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याची मोहीम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे  माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले . ते  ७ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता हॉटेल वाशिमकर  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते . 

ते म्हणाले की एका व्यक्तीच्या अवयव दानाने किमान ६ व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. त्यामुळे अवयव दानाचे महत्त्व समजावून सांगून अवयव दानाचे फॉर्म भरून घेण्याचे कार्य राज्यात राबविणार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद करणारआहे .छगनराव भुजबळ यांनी ओ बी सी च्या हक्कासाठी देश पातळीवर लढा उभारला .ते मनुवादी लोकांना सहन न झाल्याने खोटे आरोप करून त्यांनी भुजबळ यांना तुरुंगात टाकले .या संकटातून ते बाहेर पडतील असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रतिपादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी केले त्यांनी छगनराव भुजबळ यांनी ओबीसी साठी केलेल्या कायार्ची माहिती दिली .या बैठकीला समता परिषदेचे मार्गदर्शक रवी सोनवणे , जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे ,माजी जिल्हा अध्यक्ष नारायणराव जाधव ,जिल्हा उपअध्यक्ष लक्ष्मणराव जवके, रायुकॉचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव, राऊत, सेवाराम आडे ,लक्ष्मणराव जवके ,विलासराव रोकडे ,जिल्हासचिव विठ्ठल भागवत ,  जिल्हा संघटक गजानन टोंपे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संतोष गोमाशे माजी जिल्हा अध्यक्ष नारायणराव जाधव , शहर अध्यक्ष संतोष कदम  ,मानोरा तालुका अध्यक्ष धनराज दिघडे ,रिसोड तालुकाअध्यक्ष संतोष मडके , माजी नगरसेवक अरुण क्षीरसागर , जयंत इरतकर ,भागवत बोराटे , बी टी खोटें गोपालराव जाधव,,अनिल खोटे,गोरखनाथ भागवत, संजय भागवत ,गजानन बुधे महेश वानखेडे,कितीर्कुमार गावंडे, ज्ञानेश्वर वाशीमकरअमोल भालेराव ,अजय खोटे राहुल गाभणे, अमर गाभणे आदी होते.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब भुजबळ होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन संतोष गोमाशे यांनी केले.

Web Title: Samata Parishad will organize an organ donation campaign in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.