शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:35 PM2019-05-29T14:35:45+5:302019-05-29T14:36:01+5:30
शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सततच्या नापीकीमुळे, दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणी शासकिय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शेतककºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे . यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळ निवारणासाठी, शेतकर्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शेतकºयांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद असलेल्या मागण्यांमध्ये राज्यातील शेतकर्यांना पेरणी साठी एकरी दहा हजार रुपये देण्यात यावे , चारा छावण्यांची संख्या वाढवावी , नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी मुबलक शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे , शेतकर्यांची सरसकट कर्ज माफी देणयात यावी , शेतकर्यांना शेतीपंपाची विद्युत बिले माफ करावीत, शेतकर्यांच्या मुला मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे , शेतकर्यांना बिनव्याजी २ लाख रुपये कर्ज देण्यात यावे , ७२ हजार रिक्त जागेवर मराठा आरक्षण लागू करून नोकर भरती तात्काळ करण्यात यावी , अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला २ हजार कोटी रुपये निधी तात्काळ वर्ग करण्यात यावा समावेश आहे. सदर मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा या जनहिताच्या मागणीसाठी महाराष्ट्राभर संभाजी ब्रिगेड च्यावतीने तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, उपाध्यक्ष राजुभाऊ कोंघे, कार्याध्यक्ष गणेश अढाव, उपाध्यक्ष प्रमोद महल्ले, उपाध्यक्ष गोपाल देशमुख, संघटक गजानन देशमुख, विशाल उगले, तालुका उपाध्यक्ष किसन मामा इरतकर, गणेश भोयर, अमोल शिंदे, गफूर पप्पुवाले, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.