पोहरादेवी संस्थानला जोडणाऱ्या चार रस्त्यांच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:58+5:302021-02-20T05:55:58+5:30
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत पोहरादेवी संस्थानला जोडणाºया चार रस्त्यांच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत पोहरादेवी संस्थानला जोडणाºया चार रस्त्यांच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे, पोहरादेवी संस्थानचे बलदेव राठोड महाराज यांच्यासह वाशिमचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. पोहरादेवी ते सिंगद रस्त्याचे दोन पदरी रुंदीकरण, पोहरादेवी ते सावळी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, पोहरादेवी ते धानोरा रस्त्याची दुरुस्ती आणि नगाराभवन ते वसंतनगर (पोहरादेवी) रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली बांधकाम या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. पोहरादेवी संस्थानचे बलदेव राठोड महाराज यांनी पोहरादेवी संस्थानला जोडणाºया रस्त्यांचे रुंदीकरण, खडीकरण व दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांची मागणीची दखल घेत मंत्रिमहोदयांनी आजच्या बैठकीत या कामांना मंजुरी दिली.