पाटील महाविद्यालय इमारतीमध्ये कोविड केअर सेंटरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:43+5:302021-05-04T04:18:43+5:30
मानोरा येथे कोविड सेंटर व्ह्यावे अशी अनेकांची मागणी होती. येथे कोविड सेंटर नसल्याने कोविड रुग्ण यांना कारंजा, मंगरुळपीर, ...
मानोरा येथे कोविड सेंटर व्ह्यावे अशी अनेकांची मागणी होती. येथे कोविड सेंटर नसल्याने कोविड रुग्ण यांना कारंजा, मंगरुळपीर, दिग्रस येथे पाठविले जायचे. परिणामी वेळ, पैसा खर्च होत असे. आता मानोरा येथे कोविड़ सेंटर सुरू होत असल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. या आदेशानुसार मानोरा येथील मातोश्री सुभद्राबाई पाटील पाटील महाविद्यालय (महिला वसतिगृह) इमारत अधिग्रहित करून या ठिकाणी सरकारी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
कोट
महाविद्यालयाची नवीन महिला वसतिगृह इमारतीची पाहणी तहसीलदार यांनी केली होती. आम्ही इमारत देण्यास तयार होतो. भाडेसुद्धा मागितले नाही. इमारत सुसज्ज आहे. त्यामुळे येथे कोविड सेंटर मंजूर केले.
अरविंद पाटील इंगोले
अध्यक्ष, मासुपा संस्था.