विविध मागण्यांसाठी कोंडोलीवासीय उपोषणाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:41+5:302021-08-17T04:47:41+5:30

कोंडोली येथील ग्रामस्थांनी मानोरा तहसीलदारांना १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या नमूद करून त्या सोडविण्याची मागणी केली आहे. ...

In the sanctity of the Kondolivasi fast for various demands | विविध मागण्यांसाठी कोंडोलीवासीय उपोषणाच्या पवित्र्यात

विविध मागण्यांसाठी कोंडोलीवासीय उपोषणाच्या पवित्र्यात

Next

कोंडोली येथील ग्रामस्थांनी मानोरा तहसीलदारांना १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या नमूद करून त्या सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये मानोरा तहसील कार्यालय परिसरात स्त्री-पुरुषांकरीता सार्वजनिक प्रसाधनगृह बांधणे, नक्कल विभागाकडून नक्कल अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारणे, २७ ऑक्टोबर रोजी आगीच्या घटनेत घर जळून व गुरे दगावून आर्थिक नुकसान झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई देणे, अतिवृष्टी, पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे, संजय गांधी निराधार योजनेतील अशिक्षित लाभार्थींकरीता अट शिथिल करणे, संजय गांधी योजनेतील घटस्फोटीत महिलांकरीता घटस्फोटाबाबतची अट शिथिल करणे आदींचा समावेश आहे. याची दखल न घेतल्यास मानोरा तहसील कार्यालयासमोर २३ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनावर किशोर रुमकर, सोनबा शांबोले, जनाबाई शिंगाडे, नंदा भवड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: In the sanctity of the Kondolivasi fast for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.