महामार्गावर पडली रेती; अपघाताची बळावली भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:07+5:302021-09-17T04:49:07+5:30
वाशिम : अकोला-वाशिम महामार्गावर वाशिमपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झाकलवाडी फाट्याजवळ एका बाजूला रेती पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. अकोला ...
वाशिम : अकोला-वाशिम महामार्गावर वाशिमपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झाकलवाडी फाट्याजवळ एका बाजूला रेती पडल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
अकोला ते वाशिम या महामार्गावर वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता वाशिमपासून पाच किमी अंतरावरचे खड्डे बुजविण्यात येत आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. असे असतानाच दोन दिवसांपासून एका ट्रकमधील रेती झाकलवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या एका बाजूवर पडलेली आहे. यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रस्त्यावरील रेती न दिसल्याने एका दुचाकीचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या रस्त्यावर रेती कायम असल्याने वाहतुकीस व्यत्यय निर्माण होत आहे. रस्त्यावरील रेती केव्हा हटविणार? असा प्रश्न वाहनचालकांमधून उपस्थित केला जात आहे.