‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:51 PM2018-09-12T17:51:56+5:302018-09-12T17:52:26+5:30
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली.
वाशिम : ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली. उर्वरीत ग्रामपंचायतींची जबाबदारी वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकारी, कर्मचाºयांवर सोपविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.
स्वच्छतेसंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, गाव हगणदरीमुक्त करणे, शासकीय व निमशासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवणे याबरोबरच स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभी करणे या दृष्टिकोनातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना समन्वयातून वर्ग एक ते तीन दर्जाच्या अधिकाºयांवर एक, एक गाव नेमून देण्याची जबाबदारी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभगााने सोपविली आहे. सदर कर्मचाºयांना १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या अभियान कालावधीत संबंधित गावातील उपक्रमांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान व्यापक करण्यासाठी प्रत्येक गावात ठरवून दिलेले सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत व त्या उपक्रमांचे संनियंत्रण होण्याकरीता वर्ग एक ते तीनच्या अधिकारी, कर्मचाºयांना ग्रामपंचायत नेमून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद स्तरावरून ७० ग्रामपंचायत स्तरावर ७० नोडल अधिकारी नेमून दिले आहेत. उर्वरीत ग्राम पंचायतींमध्ये नोडल अधिकारी म्हणून अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिश्रा व मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी विभाग प्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकाºयांना दिल्या.