संजय गांधी निराधार समितीचे पद रिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:56 PM2017-08-01T19:56:34+5:302017-08-01T19:58:04+5:30
कारंजा लाड : कारंजा तालुकास्तरीय संजय गांधी तालुका स्तरीय निराधार योजना समितीचे अध्यक्षपदाकरीता नाव सुचविण्याचे पत्र वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने वाशिम पालकमंत्री तथा नामदार संजय राठोड महसुल राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांना नुकतेच पाठवले. त्यामुळे या महत्वाच्या पदावर कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची निवड होते याकडे सर्व तालुका वासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी भाजपा पक्षातील तालुक्यातील पदाधिकारी निरंजन जर्नादन करडे होते. दरम्यान पोलीस निरीक्षक धनज बु. यांच्याकडून प्राप्त जातपडताळणी अहवाल २ फेब्रुवारी २०१६ नुसार निरंजन करडे यांचेवर गुन्हाची नोंदीचा उल्लेख केला नसल्याने त्यांनी संजय गांधी निराधार योजना अनुदान समितीवर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतू या पदावर झालेली नेमणुक अयोग्य असल्याची तक्रार अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना प्राप्त झाला होता. त्यानुसार वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून निरंजन करडे रा. दोनद बु. यांच्यावर गुन्हा दाखल आहे कींवा नाही या बाबत सगोल तपासणी अहवाल मागविण्यात आला. वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या चरीत्रपडताळणी अहवालानुसार निरंजन करडे यांच्यावर धनज पोलीस स्टेशन अंतर्गत काही गुन्हांची नोंद असल्याचा तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये ही काही प्रकरणे न्याय प्रविष्ठ असल्याचा अहवाल दिला आहे. त्या अहवालानुसार निरंजन करडे यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद खारीज करण्यात येत असून त्यांच्या जागेवर दुस-या व्यक्तीचे नाव तात्काळ सुचवावे असे वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी यांनी २४ जुलै रोजी महसुल राज्यमंत्री तथा वाशिम पालकमंत्री यांचे खाजगी सचिव यांना पाठवलेल्या पत्रातून नमुद केले आहे.