संजय कडोळे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:12+5:302021-05-14T04:41:12+5:30
वाशिम : कोरोनाकाळात केलेल्या उत्कृष्ट कार्याप्रति कारंजा येथील संजय कडोळे यांना विश्वात्मक मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कोविड योद्धा ...
वाशिम : कोरोनाकाळात केलेल्या उत्कृष्ट कार्याप्रति कारंजा येथील संजय कडोळे यांना विश्वात्मक मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त १२ मे रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
..................
आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांना अकोला ‘रेफर’ केले जात आहे. प्रशासनाने आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.
00000000
रस्ता दुभाजकांमधील वृक्ष कोमेजले
वाशिम : रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यात लावलेले वृक्ष मात्र पाणी मिळत नसल्याने व योग्य देखभालीअभावी कोमेजून गेल्याचे चित्र वाशिम-रिसोड मार्गावर दिसून येत आहे.
0000000000000
वाढीव दर कमी करण्याची मागणी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे मासिक बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. दर कमी करण्याची मागणी शिरपूर येथील उषा जाधव यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली.
0000000000000000
जलस्रोतांच्या पातळीत झपाट्याने घट
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. यामुळे बाष्पीभवन होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सिंचन तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. दुसरीकडे जलस्रोतांची पातळीही खालावल्याने पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत.
000000000000
वाशिम येथे सापाला जीवदान
वाशिम : येथील सर्पमित्र मो. समीर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी लाखाळा परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी हजर होऊन तासाभराच्या प्रयत्नांनंतर सापाला ताब्यात घेऊन एकबुर्जी प्रकल्पानजीक सुरक्षितस्थळी सोडून दिले.