मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 02:41 PM2019-05-29T14:41:35+5:302019-05-29T14:41:41+5:30

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा असा उपदेश श्वेतांबर जैन मुनीश्री पंन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी  आपल्या अमृतमय वाणीव्दारे प्रवचनादरम्यान श्रोत्यांना दिला. 

Sanskar should be done on children in childhood - Shri Padmadarshan Vijayji | मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन :  मुले ही देवाघरची फुले आहेत त्यांना जसे घडवाल तसे घडतील सुसंस्कारातील पीढी जर हवी असेल तर मुलांवर बालवयातच संस्कार घडवा असा उपदेश श्वेतांबर जैन मुनीश्री पंन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी  आपल्या अमृतमय वाणीव्दारे प्रवचनादरम्यान श्रोत्यांना दिला. 
स्थानिक पारस बाग येथे मुनिश्री पद्मदर्शन महाराज यांच्या प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी पंन्यास प्रवचन श्री विमलहंस विजयजी  महाराज व पंन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज आदी ठाणा पाच उपस्थित होते. यावेळी मुनिश्री पद्मदर्शनजी प्रवचनात पुढे म्हणाले की, बालक हे  लहानपणी निर्दोष व सरळ असतात मनाने ते शुद्ध असतात बालवयातच त्यांच्यावर चांगले संस्कार केल्यास भविष्यात ते सज्जन व्यक्तीच नव्हे तर संत सुद्धा बनू शकतात. त्यामुळे बालकांवर लहानपणीच संस्कार करणे आवश्यक आहे. लहानपणी बालकांना केवळ  शिक्षणावर भर न देता स्वावलंबी, मेहनती, विनयशील, विनम्रता आदी सद्गुनांचे बिजारोपन केले पाहीजे. ग्रिष्म ऋुतूत बौद्धीक विकासासाठी विविध शिबीरांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केले पाहीजे शिवाय मैदानी क्रिडांचे आयोजन करून त्यांच्या शारीरीक विकासाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले पाहीजे. असा उपदेश देत अन्यथा वृद्धापन काळात पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मुनिश्रींनी यावेळी उपस्थित श्रोत्यांना दिला.

Web Title: Sanskar should be done on children in childhood - Shri Padmadarshan Vijayji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.