काजळेश्वर येथील संत आप्पा स्वामीजींचा यात्रौत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:59+5:302021-03-14T04:36:59+5:30

महाराजांची यात्रा आयोजित केली जाते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसह यात्रौत्सवावर बंदी घातल्याने आप्पा स्वामी ...

Sant Appa Swamiji's Yatrautsav at Kajleshwar canceled | काजळेश्वर येथील संत आप्पा स्वामीजींचा यात्रौत्सव रद्द

काजळेश्वर येथील संत आप्पा स्वामीजींचा यात्रौत्सव रद्द

Next

महाराजांची यात्रा आयोजित केली जाते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांसह यात्रौत्सवावर बंदी घातल्याने आप्पा स्वामी महाराजांचा यात्रौत्सव रद्द करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

दर वर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काजळेश्वर येथे श्री संत आप्पा स्वामी भक्तांनी आप्पा स्वामी मंदिर परिसर गजबजलेला असतो. अनेक भाविक नवसाचा प्रसाद येथे तयार करतात. महाप्रसादही वितरीत केला जातो, यंदा मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाच्या नियमांचे पालन करून हा यात्रौत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थानचे पुजारी गजानन उपाध्ये, नीलेश उपाध्ये, पोलीस पाटील सचिन हाते यांनी दिली. यात्रौत्सव रद्द झाल्यामुळे श्री संत आप्पा स्वामीजींचा मंदिर परिसर शांत होता . निवडक भाविकांकडून आप्पा स्वामीजींची पूजा, आरती करण्यात आल्याची माहिती पुजारी गजानन उपाध्ये यांनी दिली .

Web Title: Sant Appa Swamiji's Yatrautsav at Kajleshwar canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.