संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:39+5:302021-02-16T04:41:39+5:30
---- मानोरा तालुक्यात सेवालाल महाराज जयंती उत्साहात (15६ँ03), (15६ँ04) मानोरा : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची ...
----
मानोरा तालुक्यात सेवालाल महाराज जयंती उत्साहात (15६ँ03), (15६ँ04)
मानोरा : बंजारा समाजाचे धर्मगुरु, संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती १५ फेब्रुवारी रोजी मानोरा तालुक्यात ठिक ठिकाणी साजरी करण्यात आली.
मानोरा तालुक्यातील माधवराव पाटील विद्यालय कार्ली येथे सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक उपेंद्र पाटील, शिक्षक माणिक डेरे, किशोर जाधव, योगेश गहुले, पवन पाटील, निरंजन उपाधे, संतोष गावंडे, रघू भगत आदी उपस्थित होते. किशोर जाधव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे मुख्याधापक प्रसेन भगत यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला हार करुण अभिवादन केले. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. वसंतराव विद्यालय वरोली येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बंजारा बांधवांची पारंपरिक वेशभूषा करून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक योगेश देशमुख यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती. एल.एस.पी.एम. हायस्कूल धामणी मानोरा येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका सुधा इंगोले, प्रा. संजय हांडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय मानोरा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. आपास्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुरजना (आढाव) येथे संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य रघुनाथ उखळे, उपप्राचार्य चिंचोले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. काशीबाई राठोड विद्यालय सोयजना येथे संत सेवालाल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक विजयकांत इंगळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा शिवाजीनगर धामणी येथे जगद्गुरु संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख सुधीर काळे, मुख्याधापक, शिक्षक उपस्थित होते.