दोन दिवसांत चार सापांना जीवदान; सर्पमित्रांची कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:12 PM2018-09-11T15:12:32+5:302018-09-11T15:14:05+5:30

वाशिम:  वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले.

Sarpamitra save Life of four snakes in two days | दोन दिवसांत चार सापांना जीवदान; सर्पमित्रांची कामगिरी 

दोन दिवसांत चार सापांना जीवदान; सर्पमित्रांची कामगिरी 

Next
ठळक मुद्देमानोरा तालुक्यातील धामणी येथे विहिरीत आढळलेल्या नागालाही सर्पमित्रांनी बाहेर काढले. मंगरुळपीर शहरातील एका सार्वजनिक वाचनालय परिसरात १० सप्टेंबर रोजी तब्बल साडे चार फुट लांबीचा नाग आढळून आला.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. यामध्ये मानोरा तालुक्यातील धामणी येथे विहिरीत आढळलेल्या नागालाही सर्पमित्रांनी बाहेर काढले. 
मंगरुळपीर शहरातील एका सार्वजनिक वाचनालय परिसरात १० सप्टेंबर रोजी तब्बल साडे चार फुट लांबीचा नाग आढळून आला. ही माहिती मिळाल्यानंतर मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व त्यांचे सहकारी उल्हास मांढरे यांनी तो नाग पकडून त्याला वाशिम मार्गावरील जंगलात सोडत जीवदा दिले. याच दिवशी मंगरुळपीर शहरातील बिरबलनाथ महाराज मंदिराजवळ  सुबोध साठे, शुभम ठाकूर आणि उल्हास मांढरे यांनी एक बिनविषारी साप पकडून त्याला जंगलात सोडत जीवदान दिले. त्यानंतर मंगळवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील धामणी शिवारात गणेश शेळके यांच्या विहिरीत आढलेल्या साडे चार फुट लांबीच्या नागाला वाईल्ड कन्झर्वेशन टीमचे कोलार येथील सदस्य श्रीकांत डापसे, उमेश उगले, अतुल डापसे यांनी शिताफीने बाहेर काढत मानोरा वन परिक्षेत्रात सोडून जीवदान दिले, तसेच कारंजा मार्गावरील शासकीय रोपवाटिकेतही मंगळवारी सकाळी आढळून आलेल्या चार फुट लांबीच्या नागाला श्रीकांत डापसे, उमेश जंगले, संदीप ठाकरे, नंदू सातपुते यांनी पकडून पारवा वन परिक्षेत्रात सोडत जीवदान दिले. वातावरणात उष्मा निर्माण झाल्याने सापांचा झाडाझुडपांत वावर वाढला असून, शेतकर, शेतमजुरांसह सर्वसामान्य लोकांनी याची खबरदारी घेण्याचे आवाहन गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे.

Web Title: Sarpamitra save Life of four snakes in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.