सरपंचांसह सदस्यांनी ठोकले शिरपूर ग्रामपंचायतीला कुलूप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:08 PM2018-07-25T13:08:53+5:302018-07-25T13:10:26+5:30

सरपंंच सुनिता अंभोरे यांच्यासह उपसरपंच व १२ सदस्यांनी २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

The Sarpanch lock the gram panchayat shirpur | सरपंचांसह सदस्यांनी ठोकले शिरपूर ग्रामपंचायतीला कुलूप 

सरपंचांसह सदस्यांनी ठोकले शिरपूर ग्रामपंचायतीला कुलूप 

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामविकास अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सरपंच सुनिता अंभोरे यांच्यासह सदस्यांनी दिला होता.कार्यवाही झाली नसल्याचे पाहून २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.


लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव  : तालुक्यातील शिरपुर जैन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे सतत गैरहजर राहणे, कार्यालयीन रजिस्टर, फाईल घरी नेणे, कामांना विलंब करणे आदी कारणामुळे त्यांची चौकशी करुन तात्काळ बदली करावी ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून सरपंंच सुनिता अंभोरे यांच्यासह उपसरपंच व १२ सदस्यांनी २५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
ग्राम विकास अधिकारी विष्णु नवघरे हे कार्यालयात सतत गैरहजर राहतात. तसेच कार्यालयीन महत्वाचे रजिस्टर, चेक बुक, विविध फाईल्स कार्यालयात न ठेवता सोबत घेवुन जातात. या  कारणामुळे सरपंच सुनिता अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले, ग्रामपंचायत सदस्य संतोष भालेराव, अश्विनी देशमुख, गंगोबाई गौरवे, रामा गडदे, संजयसिंह गौर, विमल भालेराव,  किशोर इगंळे, इंदुबाई इरतकर, शिवकन्या सारडा, अहमद बेग,  सुरेखा वानखेडे आदींनी गटविकास अधिकाºयांना १८ जुलै रोजी निवेदन देत ग्रामविकास अधिकाºयांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. २४ जुलैपर्यंत चौकशी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा सरपंच सुनिता अंभोरे, उपसरपंच असलम परसुवाले यांच्यासह सदस्यांनी दिला होता. चौकशी तसेच कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे पाहून २५ जुलै रोजी सरपंचांसह उपसरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

Web Title: The Sarpanch lock the gram panchayat shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.