कारंजात १४ पैकी ९ ग्रामपंचायतींचे सरपंच अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:42 AM2021-02-16T04:42:27+5:302021-02-16T04:42:27+5:30
कारंजा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक सोमवार १५ फेब्रुवारी रोजी झाली. यात ९ सरपंच आणि १० उपसरपंचांची ...
कारंजा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक सोमवार १५ फेब्रुवारी रोजी झाली. यात ९ सरपंच आणि १० उपसरपंचांची निवड अविरोध झाली. त्यात कामरगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी साहेबराव तुमसरे अविरोध निवडून आले, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत खान रहमत खाल अजमद खान हे निवडून आले. धामणी खडी ग्रामपंचायतीत सरपंचपदी नितेश चक्रे, तर उपसरपंचपदी गजानन मोतीराम दहापुते अविरोध निवडून आले. माळेगाव येथे सरपंचपदी राजकुमार वानखडे, तर उपसरपंचपदी शीलाबाई प्रकाश घाडगे अविरोध निवडून आले. भामदेवीत सरपंचपदी वंदना अंबरकर, तर उपसरपंचपदी मिलिंद फुलमाळी अविरोध झाले, लाडेगावात सरपंच पदी अर्चना चक्रनारायण अविरोध, तर उपसरपंचपदी सुवर्णा लाड या निवडून आल्या. बेंबळा येथे सरपंचपदी रेखा जवंजाळ आणि उपसरपंचपदी विशाल ठाकरे अविरोध झाले. शेलू बु. येथे सरपंचपदी कल्पना रामेश्वर येवले आणि उपसरपंचपदी सीमा आनंद ढोके हे विजयी झाले. उंबर्डा बाजार येथे सरपंचपदी राज चौधरी, तर उपसरपंचपदावर रघुनाथ पिसाजी भगत विजयी झाले. सोमठाणा येथील सरपंच पद रिक्त असून, उपसरपंचपदी रूपाली सुधाकर कोळकर अविरोध निवडून आल्या. हिंगणवाडीत अंकुश भंडे सरपंचपदी निवडून आले, तर उपसरपंचपदी शीला दुर्योधन अविरोध झाल्या. पिंप्री मोडक येथे सुषमा वानखडे सरपंचपदी, तर उपसरपंचपदी कनिराम जाधव अविरोध झाले. शेवती येथे कोमल सावके सरपंचपदी, तर गजानन मोतीराम गांजरे उपसरपंचपदी अविरोध झाले. त्याशिवाय मुरंबी येथे संगीता चौधरी सरपंचपदी, तर सुवर्णा व-हाडे उपसरपंचपदी अविरोध झाल्या.