वाशिम जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवकांचे १८ फेब्रुवारीला कायदेविषयक शिबिर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:45 PM2018-02-12T17:45:41+5:302018-02-12T17:49:46+5:30
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे एकदिवसीय कायदेविषयक शिबिर व संविधान भेट समारंभ येत्या १८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे.
वाशिम पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बळवंत अरखराव राहतील. गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्याहस्ते उद्घाटन होईल. समाजकल्याण अधिकारी अमोल यावलीकर, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अॅड. प्रशांत इंगळे, गजेंद्र सुरकार, प्रमोद मापारी, हंसराज शेंडे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित सरपंच, ग्रामसेवकांना भारतीय संविधान भेट देवून ग्रामविकासाच्या दृष्टीने त्यांना कायदेशीर हक्क कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
तथापि, कायदेविषयक शिबिरास जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पी.एस. खंदारे, माधवराव अंभोरे, डॉ. रामकृष्ण कालापाड, मधुकर जुमडे, राजीव दारोकार, अजय ढवळे, प्रा. सुभाष अंभोरे, हरिदास बनसोड, विनोद पट्टेबहादूर यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी केले आहे.