अन् त्याने चक्क घराच्या छतावर बसून भरला शेतकऱ्यांचा पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 11:17 AM2020-08-02T11:17:34+5:302020-08-02T11:18:22+5:30
गजानन देशमुख असे या आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे नाव असून, तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवासी आहे.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा, या धडपडीत असताना नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा आल्याने एका आपले सरकार सेवा केंद्र चालकाने थेट घराच्या टिनपत्र्यावर संगणक आणि इतर साहित्य ठेवून शेतकºयांकडून पीक विमा भरून घेतला. गजानन देशमुख असे या आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे नाव असून, तो वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील रहिवासी आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेंतर्गत १ जुलैपासून शेतकºयांकडून पीक विमा हफ्त्याचा भरणा करून घेतला जात आहे. सुरुवातीला त्यात अनेक अडचणी आल्या. काही बँकांनी नकार दिला, तर काही गावांतील सातबारा पोर्टलवर अपलोड होणे अवघड झाले होते. त्यामुळे या योजनेत शेतकºयांचा सहभाग कमी होण्याची भीती होती. आता या अडचणी दूर झाल्यानंतर शेतकºयांनी पीक विमा भरण्यासाठी घाई केली. त्यात ३१ जुलै ही अंतीम मुदत असताना नेट कनेक्टिव्हिटीचा खोडा निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली. असाच प्रकार रिसोड तालुक्यातील येवता येथील आपले सरकार सेवा केंद्रावर पाहायला मिळाला. तथापि, शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून या सेवा के द्राचे संचालक गजानन देशमुख यांनी थेट घराच्या छताच्या टिनपत्र्यावर संगणक (लॅपटॉप) आणि इतर साहित्य घेऊन जात दिवसभर शेतकºयांचा पीक विमा भरून दिला. त्यामुळे येवतासह परिसरातील अनेक शेतकºयांना या योजनेत सहभागी होणे शक्य झाले आहे.
पीकविमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलै ही अंतीम मुदत होती. त्यात येवता येथे नेट कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक गजानन देशमुख यांनी छतावर संगणक घेऊन जात शेतकºयांना पीक विमा भरून दिल्याची माहिती आमच्या सहकाºयांकडून प्राप्त झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शेतकºयांना योजनेत सहभागी होता आले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांनी सांगितले.