समाधानकारक पाऊस; पिके बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:01+5:302021-08-20T04:48:01+5:30
वन्य प्राण्यांमुळे पीक संकटात वाशिम: बांबर्डा परिसरात खरीप पिके पावसामुळे बहरत असताना आता वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात ...
वन्य प्राण्यांमुळे पीक संकटात
वाशिम: बांबर्डा परिसरात खरीप पिके पावसामुळे बहरत असताना आता वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात सापडले आहे. वन विभागाने या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
रस्त्याची अवस्था वाईट
वाशिम: वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहॉगिर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
बेघरांना घरकूल देण्याची मागणी
वाशिम : २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांच्या नोंदी नमुना नंबर ८ ला घेतल्या नाहीत. यामुळे अनेकजण घरांपासून वंचित आहेत. त्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची मागणी पी.एस. खंदारे यांनी केली.