नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून बेटी बचाओचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:40 PM2018-09-02T15:40:05+5:302018-09-02T15:41:05+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्यावर आयोजित नृत्य स्पर्धेत आगळेवेगळे नृत्य सादर करून ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्णचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्यावर आयोजित नृत्य स्पर्धेत आगळेवेगळे नृत्य सादर करून ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्णचा संदेश दिला. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थान व ओंकार संगीत साधना विद्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रात गणल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात २ सप्टेंबर रोजी मुलींसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. विविध शाळांतील विद्यार्थीनी व नृत्य समुहांनी या स्पर्धेत भाग घेत आकर्षक नृत्यकला सादर केल्या. याच स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील चिमुकल्या मुलींनी आगळेवेगळे नृत्य सादर करून बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश दिला. त्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या स्पर्धेत प्राथमिक गट वर्ग ३ ते ६, माध्यमिक गट वर्ग ७ ते १० अशा दोन गटांसह दिव्यांगांच्या खुल्या गटाचा समावेश करण्यात आला होता.