वाशिम येथे ३  ते १२ जानेवारी दरम्यान सावित्री, जिजाऊ दशरात्रौत्सव; मराठा सेवा संघाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:45 PM2018-01-01T23:45:12+5:302018-01-01T23:45:24+5:30

वाशिम : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून ते १२ जानेवारी या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनापर्यंतचा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी सोमवारी दिली.

Savitri, Jijau Dasrathautsv from January 3 to 12 in Washim; Organizing Maratha Seva Sangh | वाशिम येथे ३  ते १२ जानेवारी दरम्यान सावित्री, जिजाऊ दशरात्रौत्सव; मराठा सेवा संघाचे आयोजन

वाशिम येथे ३  ते १२ जानेवारी दरम्यान सावित्री, जिजाऊ दशरात्रौत्सव; मराठा सेवा संघाचे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्दे१० दिवस विविध सामाजिक उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून ते १२ जानेवारी या राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनापर्यंतचा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले यांनी सोमवारी दिली. रविवारी मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे कार्यक्रम याच महोत्सवापासून सुरू होत असून वाशिम व अकोला जिल्ह्यात ३ जानेवारी ते १२ जानेवारी हा कालावधी सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सवाच्या नावाने मराठा सेवा संघ व विविध कक्षांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत आहे. वाशिम जिल्ह्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्यात गाव तेथे शाखा उद्धाटन या अभियानाला प्रारंभ होत असून विविध ठिकाणी संवाद बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी काम करतील. ६ जानेवारीला मराठा सेवा संघाचे वतीने विविध शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पधेर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुख्य कार्यक्रम काजळांबा येथे होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सोनटक्के यांनी केले आहे. ७ जानेवारीला पिंपळगाव डाक बंगला येथे डॉ. डिगांबर निरगुडे हे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करतील. ८ जानेवारी रोजी शाळा परिसर सफाई, ग्रामसफाई तसेच ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम उमरा शमशोद्दीन येथे संजय पडोळे, उत्तमराव आहेर व योगेश खोडके राबवतील. ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण पाटील, सचिव हभप निवृत्ती महाराज भालेराव, कार्याध्यक्ष हभप वामन महाराज महाले  यांच्या वतीने जांभरुण महाली येथे उपक्रम राबवण्यात येणार असून यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता व संत तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर या विषयावर उद्बोधन होणार आहे. या कार्यक्रमात सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title: Savitri, Jijau Dasrathautsv from January 3 to 12 in Washim; Organizing Maratha Seva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम