‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 04:23 PM2019-05-05T16:23:42+5:302019-05-05T16:23:47+5:30

वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे

Savitribai Phule Scholarship Scheme for 'ST' employees children | ‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

‘एसटी ’कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे. या संदर्भात राज्यातील सर्वच कार्यशाळा व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना या संदर्भात पत्राद्वारे सुचित करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) त्यांच्या कर्मचाºयांच्या पाल्यांसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याबाबत ५ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या पत्राद्वारे ठरविले होते. सदर योजना लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आल्यानंतर एसटीच्या विविध विभागीय स्तरावरून काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्या सर्व शंकांचा खुलासा करून महामंडळाने ही योजना लागू करून अधिकाधिक कर्मचाºयांच्या पाल्यांना त्याचा लाभ देण्याच्या सुचना विभागस्तरावर दिल्या आहेत. त्यात एखाद्या कर्मचाºयाचा पाल्य १० वीनंतर पदविका घेऊन बी.ई चे (अभियांत्रिकी) शिक्षण घेत असल्यास सदर योजनेचा त्याला लाभ देता येणार आहे. एखाद्या कर्मचाºयाच्या पाल्याने १२ वीनंतर बीए, बीएससी, बीफॉर्म, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रम सोडून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास सदर पाल्यांना पदविका अभ्यासक्रमासाठी पुन्हा ७५० रुपये शिष्यवृत्ती देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त विद्यापीठाची यादी व त्या अभ्यासक्रमाचा निश्चित कालावधी शोधून त्या आधारे लाभ अनुज्ञेय होणार आहे. या योजनेपूर्वी एखाद्या कर्मचाºयाच्या पाल्यास नियमित शिष्यवृत्ती मंजूर झाली असली तरी, महामंडळाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. सदर शिष्यवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर अभ्यासक्रम सोडल्यास शिष्यवृत्ती घेतलेल्या वर्षाची दुसºया अभ्यासक्रमाच्या उरलेल्या वर्षासाठी समायोजन करून अगोदरचा किंवा नंतरच्या अभ्यासक्रमापैकी कमी कालावधीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी ग्राह्य धरला जाणार आहे. तृतीय श्रेणीतून द्वितीय श्रेणीत बढती झाल्यानंतरही संबंधित कर्मचाºयाच्या पाल्यास पूर्वी मंजूर शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. १ नोव्हेंअर २००१ पूर्वी ३ मुले असणाºया आणि १ नोव्हेंबर २००१ नंतर २ मुले असणाºया कर्मचाºयांना त्यांच्या पाल्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटंूब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. शिष्यवृत्तीचा कालावधी प्रवेश घेतल्यापासून परिक्षेपर्यंतचा राहणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण असताना एटीकेटी असल्यासही या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.
 

Web Title: Savitribai Phule Scholarship Scheme for 'ST' employees children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.