लग्न लावून का देत नाही, असे म्हणत मुलाने केली जन्मदात्याची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 11:31 AM2021-11-07T11:31:45+5:302021-11-07T11:31:50+5:30

Crime News : धर्मा भारती, असे मृताचे नाव असून प्रमोद भारती असे आरोपीचे नाव आहे.

Saying why he doesn't get married, the child killed his mother! | लग्न लावून का देत नाही, असे म्हणत मुलाने केली जन्मदात्याची हत्या!

लग्न लावून का देत नाही, असे म्हणत मुलाने केली जन्मदात्याची हत्या!

googlenewsNext

वाशिम : लग्न लावून का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून मुलानेच जन्मदात्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची संतापजनक व धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे ५ नोव्हेंबर रोजी रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी आरोपी मुलास अटक केली. धर्मा भारती, असे मृताचे नाव असून प्रमोद भारती असे आरोपीचे नाव आहे.

जऊळका रेल्वे येथील संजीवनी महादेव भारती यांनी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा दीर प्रमोद भारती (३०) हा लग्न का लावून देत नाही या कारणावरून वडील धर्मा भारती यांना वारंवार शिवीगाळ करीत होता. लग्न का करून देत नाही, मला मुंजाच ठेवता का? अशा क्षुल्लक कारणावरून ५ नोव्हेंबर रोजी प्रमोदने शिवीगाळ करीत वडिलाशी वाद घातला. तुला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तर कर; परंतु, शिवीगाळ करू नको, असे वडिलांनी म्हणताच प्रमोदने लोखंडी कुऱ्हाडीने वडिलाच्या डोक्यावर तसेच दोन्ही पायावर वार केले. याचवेळी प्रमोदने फिर्यादी तसेच भावालादेखील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमीला अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३०२, ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे करीत आहेत.

 

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार आजिनाथ मोरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणात मुलगा हाच आरोपी असल्याने निष्पन्न झाल्याने पोलिसांनी प्रमोद भारती याला ताब्यात घेतले.

Web Title: Saying why he doesn't get married, the child killed his mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.