जागेअभावी घरकुलांचा लाभ रखडला

By admin | Published: January 17, 2015 12:26 AM2015-01-17T00:26:54+5:302015-01-17T00:26:54+5:30

पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हाधिका-यांना निवेदन.

The scarcity of the housework remained unimpressive | जागेअभावी घरकुलांचा लाभ रखडला

जागेअभावी घरकुलांचा लाभ रखडला

Next

वाशिम : सरकारी जागेत १५ वर्षे वास्तव करून आणि नगर परिषदेच्या कराचा नियमित भरणा करून केवळ जागेच्या ह्यनमुना डह्ण अभावी जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ रखडला असल्याची बाब पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांच्या निदर्शना त एका निवेदनाद्वारे आणून दिली आहे. पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे यांनी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांची भेट घेऊन विविध बाबींवर चर्चा केली. ज्यांच्याकडे जागेचा नमुना ड नाही, त्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. सदर योजनेचा लाभ गोरगरीबांना मिळवून देवू, अशी ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली. नगर परिषद व समाजकल्याण विभागामार्फत वाशिम शहरात रेल्वेस्टेशन, हिंगोली नाका, सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे तसेच जिल्हयामध्ये विविध ठिकाणी अनुसुचित जाती जमातीच्या नागरीकांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविणे सुरु आहे. या योजनेमध्ये स्वत:च्या मालकीच्या जागेचा नमुना ड असलेल्या लोकांनाच या घरकुल योजनेचा लाभ दिल्या जात आहे. मात्र सरकारी जागेत गेल्या १0 ते १५ वषार्पासून राहणार्‍या व नगर परिषदेचा कर नियमितपणे भरणा करणार्‍यांना या घरकुल योजनेचा लाभ दिल्या जात नाही. परंतु या योजनेमध्ये काही धनदांडग्या लोकांनी पैशाची देवाणघेवाण करुन नगर परिषदेमध्ये नमुना ड काढून या योजनेमध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, असा आरोपही हिवराळे यांनी यावेळी केला.

Web Title: The scarcity of the housework remained unimpressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.