कोरोना विषाणूची धास्ती; रिसोडातील दुकाने बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:33+5:302021-02-23T05:01:33+5:30

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत चालल्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करून, जमावबंदीचे सक्तीने पालन करण्याचे ...

Scare of corona virus; Risoda shops closed! | कोरोना विषाणूची धास्ती; रिसोडातील दुकाने बंद!

कोरोना विषाणूची धास्ती; रिसोडातील दुकाने बंद!

Next

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत चालल्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम १४४ लागू करून, जमावबंदीचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, २१ फेब्रुवारी रोजी तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे, ठाणेदार एस.एम. जाधव यांचा ताफा रस्त्यावर उतरला व विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. या दरम्यान, दंडात्मक कारवाई करत असताना, प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत विना मास्क फिरणाऱ्या काही नागरिकांनी हुज्जत घातल्याचे दिसून आले.

...............

बॉक्स :

गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाचा ‘वॉच’

गेल्या काही दिवसांत लग्न ठरलेल्या अनेकांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे. मात्र, जमावबंदीच्या आदेशामुळे विवाह सोहळा कसा साजरा करावा, ही चिंता संबंधितांना सतावत आहे. प्रशासनाने शहरातील मंगल कार्यालयांना यापूर्वीच नोटीस बजावून कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला आहे. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’ आहे. त्यामुळे कुणीही कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन तहसीलदार अजित शेलार यांनी केले आहे.

Web Title: Scare of corona virus; Risoda shops closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.