ओसाड जागेवर साकारले निसर्गरम्य वनउद्यान!

By admin | Published: December 22, 2014 11:46 PM2014-12-22T23:46:48+5:302014-12-22T23:46:48+5:30

रिसोड नगराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार; जलतरण तलावही होणार.

Scenic forestry in a deserted place! | ओसाड जागेवर साकारले निसर्गरम्य वनउद्यान!

ओसाड जागेवर साकारले निसर्गरम्य वनउद्यान!

Next

रिसोड : वनविभागाच्यावतीने व केंद्र शासनाच्या सहकार्याने रिसोडजवळ शासकीय ई-क्लासच्या एका ओसाड व निर्जन जागेवर मनमोहक, निसर्गरम्य असे वनउद्यान आकारास येत आहे. येथे आणखी स्विमिंग टँक व निसर्ग परिचय केंद्र होणार असल्यामुळे तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शहराच्या सौंदर्यीकरणात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
रिसोड ते लोणी लोणार या राज्य महामार्गावर शहराच्या पश्‍चिमेस शासनाची ईक्लास जमीन आहे. ही जमीन ओसाड पडल्यागत होती. या जमिनीचा चांगल्या कामासाठी उपयोग घेता यावा म्हणून वनविभागाने संत अमरदास बाबा संस्थानपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या २ हेक्टर जमिनीत सदर उद्यान निर्मितीचा निर्णय घेतला व नियोजन करुन केंद्रशासनाच्या निधीतून उद्यान निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आकार घेत असलेले वनउद्यान हे शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठिकाणावर साकारत आहे. अमरदास बाबांच्या व लोणी येथील सखाराम महाराज संस्थानवर यात्रेनिमित्त विदर्भ, मराठवाडा तर खान्देशपासून श्रद्धेने भाविक येतात. त्यांना थोडाफार विरंगुळा म्हणून सदर उद्यान उपयोगात येणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला भेट देण्यासाठी आंतरराट्रीय पर्यटक येतात व तेसुद्धा या वनउद्यानात भेट देवू शकतात.आतापर्यंंत २ हेक्टर परिसरात सभोवताल आकर्षक असे वनविभागाच्या उदबोधक रंगात तारकुंपण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्यानात वन्यजीव प्राणी म्हणजे हरीण, ससे, कोल्हे, खोकड आदी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जलाशय निर्मिती करण्यात आलेली आहे.
रिसोड येथील वनउद्यान अंतिम टप्प्यात असून आगामी वर्षात स्विमिंग टँक करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे निसर्ग परिचय केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: Scenic forestry in a deserted place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.