अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:29 AM2020-05-15T10:29:21+5:302020-05-15T10:29:33+5:30

काही रक्कमा लाभार्थ्यांचे अचूक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने बँक खात्यातच पडून आहेत

Scholarship amount falling into the bank due to lack of proper bank account | अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत पडून

अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम बँकेत पडून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०१७-१८ शैक्षणिक वर्षात विजाभज, इमाव, विमाप्र व अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी परीक्षा (फ्री शिप) योजनेंतर्गत वितरण करण्यात आलेल्या काही रक्कमा लाभार्थ्यांचे अचूक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने बँक खात्यातच पडून आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सन २०१७-१८ मध्ये या योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांची बँक स्टेटमेंट व महाविद्यालाचे पत्र तत्काळ समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना १४ मे रोजी केले.
विद्यार्थ्यांची अचूक बँक खाते क्रमांक महाविद्यालय स्तरावरून समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकली नाही. अचूक बँक खाते क्रमांक सादर करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाने यापूर्वीही दिल्या होत्या. मात्र, महाविद्यालयांकडून लाभार्थ्यांचा बँक तपशील प्राप्त न झाल्यामुळे रक्कम बँकेतच पडून आहे. सन २०१७-१८ मध्ये योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित महाविद्यालयांनी तत्काळ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास उपलब्ध करून द्यावी. अन्यथा ही रक्कम ५ मे २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार शासन खाती जमा करण्यात येईल, असा इशाराही माया केदार यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Scholarship amount falling into the bank due to lack of proper bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.